“निवडणूक हा खेळ वाटला का?; फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत”

मुंबई |  विरोधी पक्षनेत्यांचे ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा’ विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलणाऱ्यांना पुन्हा निवडणूक परवडणार नाही ही जाणीव नाही. निवडणूक हा खेळ वाटला का? अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत, असं म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केला आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावा, जनतेच्या कोर्टात फैसला होऊन जाऊ द्या, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार टीका केली होती. यावर सचिन सावंतांनी पलटवार केला आहे.

भाजप ही हारलेली टीम नाही जिंकलेली टीम आहे. हिंमत असेल तर पुन्हा जनमत घ्या. तुम्ही तिघे लढा आम्ही एकटे लढू, फैसला होऊन जाऊद्या, असं फडणवीस म्हणाले होते. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर उद्या काय..आत्ताच..सरकार पाडून दाखवा’, असं आव्हान फडणवीस यांना केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांना केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांची मोदींवर जोरदार टीका

-“…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी”

-…म्हणून शरद पवार घाबरत आहेत- देवेंद्र फडणवीस

-आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय- सुप्रिया सुळे

-इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देणारा ‘हा’ स्टेटस व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल