‘राज’पुत्राची राजकारणात एन्ट्री होताच आमदार रोहित पवार यांचं ट्वीट; म्हणतात…

मुंबई |  ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांनी आज अधिकृतरित्या आपल्या राजकीय आयुष्याला प्रारंभ केला. गोरेगावच्या अधिवेशनात त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन, असं ट्वीट करताना त्यांनी अमित यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील, असंही रोहित यांनी म्हटलंय.

रोहित पवार यांचा राज्यातील तरूण आमदारांशी आणि कार्यकर्त्यांशी नेहमीच आपुलकीचा आणि प्रेमाचा संवाद राहिलेला आहे. विचारधारा वेगळी जरी असली तरी जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी एकत्र येऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे, अशी त्यांची धारणा असते. आज त्यांनी अमित यांच्या पॉलिटिकल एन्ट्रीचं टायमिंग साधत त्यांचा हाच गुण अधोरेकित केला आहे.

दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी अमित यांची नेतेपदी निवड घोषित केल्याचं मनसेच्या अधिवेशनाच्या मंचावरून सांगितलं. त्यांच्या या प्रस्तावाला मनसेच्या नेत्यांनी एकमताने अनुमोदन दिलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-