“एकीकडे मनसेचं अधिवेशन तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गडसंवर्धनासाठी बैठका”

मुंबई | राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन चालू आहे. यावेळी मनसेकडून पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. त्यासोबत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लाँचिंग करण्यात आलंं आहे. तर दुसरीकडे रोहित पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे विचार विनिमय करताना दिसत आहेत. याबाबत रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्याचं नवं नेतृत्व कामाला लागलंय, असं लिहून रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. यामुळे एकीकडे कात टाकत असलेला मनसे पक्ष आता हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आपल्या पक्षाच्या भूमिका बदलताना दिसत आहे.

शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत सत्तेवर आली. त्यामुळे शिवसेनेतील कट्टर हिदुत्त्ववादी असलेली मतदार नाराज झाला होता. त्यात आता मनसे आपल्या पक्षाची हिदूत्त्ववादी भूमिका घेत नाराज झालेला मतदार वर्ग आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

दरम्यान, राजमुद्रा आणि किल्ल्यांचं गडसंवर्धन असे सर्व विषय हे शिवरायांशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे शिवरायांशी संबंधित विषयांवर केंद्रीत असल्याचं दिसून येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-