मी तर माझी बॅग पॅक करून ठेवली होती पण…..- रोहित शर्मा

मुंबई |  भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामधला तिसरा टी ट्वेन्टी सामना…. 20 षटकांमध्ये दोन्ही संघांच्या 179 धावा… मॅच टाय… न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 17 धावा फटकावल्या… भारतापुढे 18 धावांचं लक्ष्य….. भारताच्या के. एल. राहुल आणि रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि या विजयाचा शिल्पकार ठरला रोहित शर्मा…! मॅचविनिंग खेळी केल्यानंतर रोहितने पत्रकार परिषदेत सामन्यादरम्यानचे अनेक मजेदार किस्से सांगितले.

हा सामना न्यूझीलंड सहजरित्या जिंकेल, असं मला वाटत होतं. पण भारताने शेवटपर्यंत जिद्द सोडली नव्हती. भारताने चांगलं कमबॅक केलं. सामना सुपर ओव्हरपर्यंत जाईल असं वाटत नसल्यानं मी बॅग आवरुन ठेवली. पण ज्यावेळी सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला तेव्हा फलंदाजी करण्यासाठी मला ते साहित्य बॅगमध्ये शोधावं लागलं, असं रोहित म्हणाले.

फलंदाजी करताना डोक्यात काय विचार सुरु होते? असा सवाल रोहितला विचारला असता, फलंदाजी करताना माझ्या मनात अनेक विचार येत होते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चुका करण्याची वाट पाहणे आणि अखेपर्यंत टिकून राहण्याचे मी ठरवलं होतं. शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्याचा आनंद होतोय, असं रोहित म्हणाला.

दरम्यान, 2 चेंडूंवर 10 धावा हव्या असताना त्याने 2 उत्तुंग षटकार खेचत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्या मॅचविनिंग खेळीला अनेक दिग्गज खेळाडूंनी सॅल्यूट ठोकलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

-मशिदींना हात लावल्यास मी मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील- आठवले

-“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”

-….याप्रकरणी भाजप राधाकृष्ण विखे पाटलांची चौकशी करणार!

-रोहित शर्माच्या मॅचविनिंग खेळीला दिग्गज क्रिकेटपटूंचा सॅल्यूट!

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक