पवारसाहेबांना पंतप्रधान बनवायचंय… कामाला लागा; रोहित पवारांची सिंहगर्जना

औरंगाबाद | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे. तशीच इच्छा आहे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांची…! आज हीच इच्छा त्यांनी औरंगाबादमध्ये बोलून दाखवली.

आगामी लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसेल आणि साहेब अजूनही तरूण आहेत, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागायला हवं, असे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी झालीये. आता लोकसभेसाही एकत्र लढलो तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांच्या वक्तव्यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंगणघाट प्रकरणातल्या पीडितेला लवकरात लवकर न्याय द्या; खा. नवनीत राणा आक्रमक

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

-एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट