आपल्या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव झाला नाही- संघ

नागपूर | आपल्या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव झाला नाही, असं सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महाल येथील संघ मुख्यलयात आज सकाळी भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध हा न समजता केला गेलेला विरोध आहे. या कायद्याला विरोध करणं चुकीचं आहे. सर्वात अगोदर सरकारने हा कायदा आणला हे समजून घेतलं पाहिजे, असं भय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे.

कळत नाही देशातील वातावरण का खराब केलं जातंय. हा कायदा समजून घ्या, असं आवाहन भय्याजी जोशी यांनी केलं आहे. तसेच या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना समावून घेतलं आहे, असं भय्याजी जोशी म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्व देशवासियांनी संविधानाता मान राखला पाहिजे, असंही भय्याजी जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-यांच्या देशभक्तीला सलाम.. हिमवीरांनी बर्फात फडकवला तिरंगा

-“जयंत पाटलांचा आंबेडकरांवरील आरोप म्हणजे निव्वळ बालिशपणा”

-आज मी जो काही आहे तो बाळासाहेबांमुळेच- नारायण राणे

-“उद्धवजी, लेकाचे हट्ट पुरवण्याऐवजी राज्यातील इतर प्रश्न सोडवा”

-सत्काराचे पैसे वळसे पाटील करतात रूग्णांवर खर्च; समाजापुढे ठेवला एक नवा आदर्श