“गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांनो फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षावर कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली”

पुणे | अभिनेता सुशांत सिंहचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सीबीआयकडे हा तपास जाण्याअगोदर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. न्यायालयाने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा राज्यातील विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर आलं आहे.

राज्य सरकारने आत्मचिंतनाची करावं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यासोबतच आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकरात राजीनामा दयायल हवा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाण साधला आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांना मी आठवण करुन देते की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडाला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचं चाककरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणिआणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…हा तर उद्धव ठाकरे सरकारला जबरदस्त झटका- बबिता फोगट

गेल्या 70 वर्षात नाही झालं ते येत्या सात ते आठ महिन्यात होणार- राहुल गांधी

‘…तेव्हा मराठी कलाकार नाही दिसले त्यावेळी दिशा, जॅकलीनस पाहिजे असतात’; राणेंचं जोरदार टीकास्त्र!

“दाभोलकरांना मारण्यात आलं तेव्हा गृहखात राष्ट्रवादीकडेच होतं, तुमच्याच सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला”

ब्रँड इज ब्रँड! ‘क्रिकेट विश्वाच्या इतिहासात तुझं नाव…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहीला पाठवलं खास पत्र