…हा तर उद्धव ठाकरे सरकारला जबरदस्त झटका- बबिता फोगट

नवी दिल्ली | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर राज्यातील विरोधी पक्ष भाजपनेही राज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याचं म्हणत टोमणे मारले होते. अशातच कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगट यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्याचा योग्य निर्णय न्यायालयाने घेतला आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेला FIR  हा योग्य असून सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला मोठा जबरदस्त झटका बसला असल्याचं बबिता फोगट यांनी म्हटलं आहे.

आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकरात राजीनामा दयायल हव, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आल्यावर महाराष्ट्र आणि बिहारमधील भाजप नेते विधानसभा निवडणूक जिंकले असल्याप्रमाणे आनंद व्यक्त करत असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-