“तोंडातून फेस येईपर्यंत ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश केला”

मुंबई | राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपात प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हल्ला चढवला आहे.

तोंडातून फेस येईपर्यंत आपण ज्यांच्यावर टीका केली… आज आपण त्यांच्याच कळपात प्रवेश करताय, अशी जळजळीत टीका चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

कार्यकर्त्यांच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या  स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्यांना यावेळी त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन चाकणकर यांनी जनतेला केलं आहे.

चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या जागेवर रूपाली चाकणकर यांची वर्णी लागली. कार्यभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्या सरकारविरोधात आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या.

चाकणकरांच्या एकेकाळच्या सहकारी असलेल्या चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवत येणाऱ्या काळात सरकारचा ढोंगी आणि लबाड चेहरा आपण जनतेसमोर आणणार आहोत, असं चाकणकर यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.


महत्वाच्या बातम्या-

-आघाडीच्या नेत्यांना कसं फोडलं??? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुपित रहस्य!

-मी गद्दार नाही…. पळून गेले नाही- चित्रा वाघ

-राष्ट्रवादीच्या या दिग्गज नेत्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती!

-गरवारे क्लबमध्ये भाजपची ‘मेगा भरती’; ‘भाजप जोमात राष्ट्रवादी कोमात…!’

-…तर मी अमित शहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं- शरद पवार