महाराष्ट्र मुंबई

चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली!

मुंबई | राष्ट्रवादीच्या नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात आपला पदभार स्विकारला. शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून चाकणकर यांची नियुक्ती केली होती.

लोकांच्या मनात सरकारविरोधात राग आहे. अन्याय झाल्याची भावना आणि चीड आहे. हेच लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारणार आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया चाकणकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर दिली.

कुणी पक्ष सोडून गेलं म्हणून पक्षाचं काम थांबत नाही. 365 दिवस आव्हानं चालूच असतात. मोठ्या जोमाने आणि नेटाने मी पक्षाचं काम आणि संघटन वाढवण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही चाकणकर यांनी दिली.

येत्या 2 दिवसांनंतर महाराष्ट्र दौरा करून लोकांचे प्रश्न विचारात घेऊन सरकारला जाब विचारू आणि सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडू, असंही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने चाकणकर यांची या पदावर वर्णी लागली आहे.

दरम्यान, रूपाली चाकणकर याअगोदर पुणे शहराच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्ष होत्या. पण गेल्या महिन्यात त्यांचं हे पद काढून घेण्यात आलं होतं. मात्र राज्याचं अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकदिवसीय विश्वचषकानंतर आता थरार कसोटी विश्वचषकाचा! आयसीसीने केलं वेळापत्रक जाहीर

-भाजपा प्रवेश देणे आहे पण नियम व अटी लागू…; ‘पुणेरी स्टाईल पोस्टर’बाजी!

-इम्तियाज जलील यांची विजयी रॅली; संसदेत दुष्काळावर भाषण अन् रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

नारायण राणेंचं आमंत्रण शरद पवारांनी स्विकारलं!

-‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

IMPIMP