Russia Ukraine War: कीववर बलाढ्य रशियाला विजय का मिळवता आला नाही?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची 5 कारणं

नवी दिल्ली | जगातील सर्वात ताकतवान सैन्य आपल्याकडं आहे या अविर्भावात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या वागत असताना देखील त्यांच्या सैन्याला युक्रेनवर ताबा मिळवण्यात अपयश (Russia Ukraine War) येत आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सर्वशक्तीमान सैन्याला कोणत्याही किंमतीमध्ये युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

रशियन सैन्य लाखोंच्या संख्येनं कीवच्या सीमेवर धडका देत आहे. पण अद्यापही त्यांना कीववर ताबा मिळवण्यात अपयश येताना दिसतंय.

युक्रेनला जगातील अनेक राष्ट्रांकडून अप्रत्यक्षपणे मदत मिळत आहे. अनेक राष्ट्रे युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवत आहेत. परिणामी युक्रेनसाठी लढाई सोपी होत आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केल्यानंतर युक्रेनला अनेक राष्ट्रांनी युद्धविषयी साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. परिणामी रशियन सैन्याविरूद्ध लढताना युक्रेनला फायदा होत आहे.

रशियन सैनिक मोठ्या प्रमाणात कीव शहराकडं येत आहेत. पण त्यांच्या वाहनांमध्ये चीनचे टायर लावल्यानं ते ऐनवेळी खराब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

इस्राईलकडून युक्रेनला देण्यात आलेले ड्रोन हे युक्रेनसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत आहेत. ड्रोनद्वारे युक्रेन सैन्य रशियन सैन्यावर जोरदार हल्ले करत आहे.

रशियन सैन्यातील काही सैनिक हे नवखे आहेत. अनेकजणांना हे युद्ध लढायचे नाही. परिणामी रशियाची कमजोर युद्धनिती जगासमोर येत आहे.

कीव शहरात सामान्य नागरिक देखील आपल्या शहराच्या रक्षणासाठी शस्त्र घेऊन रणांगणात उतरले आहेत. परिणामी रशियाला कीववर ताबा मिळवणे कठीण जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तेव्हा दिल्लीतून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले”, मोठा गौप्यस्फोट

 काळजी घ्या…! पुढील 3 दिवस अंगाची लाहीलाही होणार, राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय