पुणे | मागील दोन वर्षापासून देशातील जनतेला महागाईची झळ बसत असल्याचं पहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर आणि भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात आशिष शेलार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी महागाईवर बोलताना केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. भारताच्या शेजारच्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. श्रीलंकेत महागाईमुळं आणीबाणी लावण्यात आली, असंही शेलार म्हणाले.
असं असलं तरी 140 कोटी नागरिकांचा भारत देश ताठ मान करून उभा आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत, असं म्हणत शेलारांनी मोदींची कौतुक केलं आहे.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार कोसळलं आहे, ते तिकडं क्लिन बोल्ड झालेत. श्रीलंकेत महागाई इतकी वाढली की आणीबाणी लावावी लागली, असंही शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मनसे भाजप युतीवर देखील आशिष शेलार यांनी वक्तव्य केलंय. युतीवर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असं शेलार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीत मोठा राडा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शांततेचं आवाहन
चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुन चंपा, सुन तारा! व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याने उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली
‘भुत पिशाच निकट नहीं आवे, जब…’; मिटकरींचा भाजपला खोचक टोला
मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…