दिल्लीत मोठा राडा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शांततेचं आवाहन

नवी दिल्ली | आज देशभरात हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. अशातच आता हनुमान जयंतीला दिल्लीत मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीच्या जहांगीर पुरी भागात मोठा मोठा हिंसाचार झाला आहे. हनुमान जयंती साजरी केली जात असताना मोठा गोंधळ उडाला. एका जमावाने गोंधळ घालत गाड्यांची तोडफोड केली.

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त जमावाने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. तर काही पोलिस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे.

या हिंसाचारात गोळीबार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या परिसरात आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. दिल्लीत शांतता राखणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुन चंपा, सुन तारा! व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याने उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

‘भुत पिशाच निकट नहीं आवे, जब…’; मिटकरींचा भाजपला खोचक टोला

मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…