Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे होतोय ‘या’ कंपन्यांना फायदा; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | सौर्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून रशियाने युक्रेनविरूद्ध युद्ध पुकारलं (Russia Ukraine War) होतं. रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवत जगाला टेन्शनमध्ये टाकलं.

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर एकामागून एक हल्ले केले. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे.

अशातच आता रशिया-युक्रेन युद्ध अंतिम टप्प्यावर आल्याचं पहायला मिळतंय. युद्ध थांबवण्यासाठी आता दोन्ही देश एकाच मंचावर वाटाघाती करत आहे.

या युद्धात फक्त युक्रेनी नागरिकांनाच नाही तर इतर देशातील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला. मात्र, असं असताना देखील या युद्धाचा काहींना फायदा देखील झाल्याचं पहायला मिळत आहे.

तज्ज्ञांच्या मते, या युद्धामुळे शस्त्रास्त्र उत्पादकांना मोठा फायदा झाला आहे. हेथिऑन आणि लॉकहीड मार्टिन या दोन अमेरिकन कंपन्यांना या युद्धाचा फायदा झाल्याचं वृत्त अमर उजालाने दिलं आहे.

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर लॉकहीडच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ तर रेथिऑनच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे.

450 दशलक्ष युरो किंमतीची शस्त्रे खरेदी करून युक्रेनला पाठवली जातील, अशी घोषणा युरोपियन युनियनने केली होती. तर दुसरीकडे अमेरिकेने देखील 35 कोटी डाॅलरची शस्त्रे पाठवणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, मागील अनेक युद्धात शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा झाला होता. अनेकांनी याला समर्थन देखील केलं होतं. आता दोन्ही देशातील युद्धावर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

लवकरच 2022 Maruti S-Cross भारतीय बाजारात धडकणार; जाणून घ्या फिचर्स

हाडं मजबूत करायची असतील तर आहारात करा ‘या’ 9 गोष्टींचा समावेश; म्हातारपणात त्रास नको

समंथा बनली साऊथची दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; मानधन ऐकाल तर थक्क व्हाल!

Budget 2022! सर्व जिल्ह्यात महिला रूग्णालय उभारणार, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

 “फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”