लवकरच 2022 Maruti S-Cross भारतीय बाजारात धडकणार; जाणून घ्या फिचर्स

मुंबई | भारतात आलिशान गाड्यांची मोठी क्रेझ असते. भारतात मोठ्या गाड्यांना जास्त पसंती देखील मिळते. त्यामुळे भारतात ऑटोमोबाईल सेक्टर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळतं.

कोरोना महामारीनं अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वाहन बाजार हा जगातील प्रमुख वाहन बाजार आहे. या बाजाराला देखील कोरोना काळाचा प्रचंड फटका बसला होता.

अशातच आता मारूती सुझुकी यावर्षी एप्रिल किंवा मे पर्यंत नेक्स्ट जनरेशन S-Cross (2022 Maruti S-Cross) भारतात लॉन्च करू शकते. येत्या दोन तीन महिन्यात गाडी लाॅन्च करण्याच्या तयारी कंपनी करत आहे.

इंजिनच्या बाबतीत 1.5-लीटर, 4-सिलेंडर, के-सीरीज, नैचुरली-एस्पिरेटेड इंजन गाडीत असणार आहे. जे XL6, Vitara Brezza, Ciaz, Ertiga आणि सध्याच्या A-Cross, S-Cross मध्ये देखील आहे.

मारुती सुझुकी नवीन 6-स्पीड युनिटसह ट्रान्समिशन अपग्रेड करू शकते. हे आधीच ग्लोबल-स्पेक S-Cross मध्ये देखील देण्यात आलं होतं.

भारतातील आगामी 2022 S-Cross सुझुकीमध्ये ऑलग्रिप AWD प्रणाली आणली जाऊ शकते. याशिवाय कारमध्ये अनेक खास फीचर्स देखील जोडले जाऊ शकतात. या कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमदेखील येण्याची शक्यता आहे.

नवीन S-Cross चे इंजिन 105 PS कमाल पॉवर आणि 138 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. कार मानक 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह बाजारात येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हाडं मजबूत करायची असतील तर आहारात करा ‘या’ 9 गोष्टींचा समावेश; म्हातारपणात त्रास नको

समंथा बनली साऊथची दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; मानधन ऐकाल तर थक्क व्हाल!

Budget 2022! सर्व जिल्ह्यात महिला रूग्णालय उभारणार, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

 “फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”

  “मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा कायम राहणार”