‘तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल…’; रशियाच्या इशाऱ्यानं जगाची चिंता वाढली

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

रशियन सैन्यानं युक्रेनवर तिन्ही दलांच्या मदतीनं हल्ला केला आहे. युक्रेनमधील एक-एक शहर रशियन सैनिक बेचिराख करत आहेत. धुराचे लोट आणि मृतदेहाचा खच पडत चालला आह, असं असलं तरी जगातील इतर देशांना हे युद्ध थांबवण्यात अपयश येत आहे.

युक्रेनमध्ये सध्या परिस्थिती खूपच नाजूक बनत चालली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील इतर देशांना मदतीचं आवाहन केलं आहे. परिणामी अनेक देशांनी युक्रेनला मदत पाठवली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मात्र जगातील जे देश युक्रेनला युद्धात मदत करतील त्यांना गंभीर परिणामी भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. अशातच आता रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

तिसरं महायुद्ध झालं तर ते नक्कीच आण्विक असेल, असं लावरोव्ह यांनी म्हटल्यानं जगाचं टेन्शन वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वीच पुतिन यांनी रशियन आण्विक विभागाला सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत.

युक्रेनला इतर देशांकडून आण्विक शस्त्रास्त्रे मिळाली तर ती जगासाठी आणि खासकरून रशियासाठी घातक असल्याचं लावरोव्ह यांनी म्हटलं आहे. आम्ही युक्रेनच्या आण्विक धोरणाला कायम विरोध करत राहू, असं लावरोव्ह म्हणाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्ध सुरू होवून आता 7 दिवस झाले आहेत. अशात दोन्ही देशांच्या शिष्टमंडळानं शांतिच्या प्रस्तावावर सहमती करण्यासाठी बैठकिचं आयोजन केलं होतं. पहिल्या फेरीत काहीच न झाल्यानं आता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.

दरम्यान, रशियाला युद्धाचे प्रचंड परिणाम सोसावे लागत आहेत. युरोपियन युनियन, अमेरिका, नाटो, संयुक्त राष्ट्र, ब्रिटन सर्वांनी रशियावर अनेकप्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “युक्रेनी सैन्याने भारतीयांना उठा-बशा काढायला लावल्या”, विद्यार्थीनीचा गंभीर आरोप

“गोपीचंद पडळकरांना संरक्षण द्या”, फडणवीसांची मागणी

“अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, ही लोकशाही आहे की तानाशाही?”

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा”