ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 14 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल; वाचा नवी नियमावली

मुंबई | गेल्या दोन वर्षापासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली आपलं आयुष्य जगत आहेत. कोरोना महामारीनं सर्व जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या आकडेवारीत आता दिवसेंदिवस घट होत असल्याचं लक्षात येतंय.

कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानं राज्य सरकारनं विविध क्षेत्रात निर्बंध लादले होते. राज्यात मास्क बंदी, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे या व्यतिरिक्त अनेक नियम सार्वजनिक ठिकाणांवर लागू होते.

राज्य सरकारनं कोरोना नियमावलीत बदल करत असल्याची घोषणा केली आहे. राज्यात लागू असलेले विविध नियम आता येत्या चार तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये लागू नसतील. परिणामी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नव्या नियमावलीनूसार राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सिनेमागृहे, सार्वजनिक उद्याने, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, नाट्यगृहे हे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे.

राज्यातील, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर या 14 जिल्ह्यांमध्ये असलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत.

राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र पर्यटनस्थळे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे, रेस्टाॅरंट इत्यादी ठिकाणी 50 टक्के क्षमतेने सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात देखील कोरोनाची रूग्णसंख्या घटत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक स्तरातून कोरोना नियमावली हटवण्याबाबत सरकारला विनंती करण्यात येत होती.

दरम्यान, कोरोना महामारीशी लढण्याचं एकमेव माध्यम लसीकरण हे असल्यानं सर्वत्र सध्या लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. कोरोना लसीकरणानंतर परिस्थिती पुर्वपदावर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“गोपीचंद पडळकरांना संरक्षण द्या”, फडणवीसांची मागणी

“अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, ही लोकशाही आहे की तानाशाही?”

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा” 

पुतिन याच्या हट्टामुळे रशियन उद्योगपतींना मोठा फटका; झालं इतकं नुकसान