पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा!

मुंबई | ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी अत्यंत धक्कादायक दावा केला. यामुळे जगभरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचा गंभीर आजारानं आधीच मृत्यू झाला असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला.

व्लादिमिर पुतिन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात आहे, असंही गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी सांगितलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच काळात गेल्या काही दिवसांपासून पुतिन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात होतं. आता दाव्यावर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा केला आहे.

रशियाकडून (Russia) या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूचं वृत्त ही अफवा आहे, असं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे.

पुतिन रोज टीव्हीवर दिसतात. तुम्ही त्यांना पाहू शकता, ऐकू शकताय याकडेही लाव्हरोव्ह यांनी लक्ष वेधल्याचं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच… 

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त  

मोठी बातमी! राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

धक्कादायक! प्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही- देवेंद्र फडणवीस