सर्वात मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का

मुंबई | गेल्या चार महिन्यांपासून एसटी संपाचा तिढा सुरु आहे. विलीणीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता.

अद्यापही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतं. एसटी कर्मचारी जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत कामावर रुजु होणार नाही, या भूमिकेवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत.

विलीकरणाच्या मागणीवर तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आंदोलन सुरु आहे. यामध्ये अनेकांनी आपले जीव गमावले.

आता एसटी संपाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली.

90 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने दिला आहे.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात हा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल परिवहन मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब हा अहवाल मांडणार आहेत.

दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सध्याची परिस्थिती खूप चिघळली आहे.

काही कर्मचाऱ्यांनी संप मोडून सेवेत रूजू झाले आहेत. मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे आणि संप करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”

  आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही 

 मोठी बातमी! रशियन सैनिकांनी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर मिळवला ताबा