हिमालयाला बांडगुळाने शिकवावं… सचिन अहिरांकडून पडळकरांचा समाचार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय. तर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे माजी नेते आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेलेले सचिन अहिर यांनी देखील पडळकरांचा समाचार घेतला आहे.

हृदय आणि आत्मा स्वच्छ ठेवून महाराष्ट्राला एका वेगळ्या ऊंचीवर नेणा-या हिमालयाला बांडगुळानं शिकवावं, या सारखा विनोद नाही, अशी खरमरीत टीका सचिन अहिर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे.

सचिन अहिर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधणारं ट्विट केलं आहे, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “हृदय आणि आत्मा स्वच्छ ठेवून महाराष्ट्राला एका वेगळ्या ऊंचीवर नेणा-या हिमालयाला बांडगुळानं शिकवाव, या सारखा विनोद नाही”

 

 

दरम्यान, राज्यातल्या विविध शहरांत आज राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात येणार आहे.

 

-ते औषध कोरोनावर नाही?; रामदेवबाबांच्या औषधाबाबत धक्कादायक खुलासा

-मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, राष्ट्रवादीच्या इच्छेनुसार मुख्य सचिवांची बदली तर….