राष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज

सोलापुर | जिल्ह्यातील अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सूपूर्त केल्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेद्वारांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेत ऑनलाईन नाव नोंदणीचं आवाहन करण्यात आलं होतं. यापाठोपाठ आता अध्यक्षपदाचीही निवडणूक आल्यानं पक्षातील तरूणांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे.

या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेद्वारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जातून योग्य निवडक उमेद्वारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. असं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजिंक्यराणा पाटील यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नुकताच अजिंक्यराणा यांनी पदाचा राजीनामा दिला. यापुढेही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत राहीलं असं मतही राणा यांनी व्यक्त केलं आहे.

 

-हिमालयाला बांडगुळाने शिकवावं… सचिन अहिरांकडून पडळकरांचा समाचार

-ते औषध कोरोनावर नाही?; रामदेवबाबांच्या औषधाबाबत धक्कादायक खुलासा