अस्पृश्य निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं कार्य श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोक्षेंची सावंतांनी उडवली खिल्ली!

मुंबई | अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. त्यांची या विधानाची काँग्रेस प्रवक्त सचिन सावंत यांनी शरद पोंक्षे यांची खिल्ली उडवली आहे.

अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असे म्हणणे म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात हॉलिवूडच्या बेन किंग्जले, अल पचिनो आणि बॉलिवूडच्या दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा शरद पोंक्षे यांचे योगदान श्रेष्ठ आहे असे म्हणणे होय!, असं ट्वीट करत त्यांनी पोक्षेंची खिल्ली उडवली आहे.

पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात काल मी सावरकर वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पुरोगामी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला होता. काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी पुरोगामी संघटनांच्या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.

दरम्यान, आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणांविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर काकणभर श्रेष्ठ आहेत, असं पोंक्षे म्हणाले होते.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-तुझी उंची किती, तू बोलतो किती…..; शिवसेना नेत्याने घेतला निलेश राणेंचा समाचार

-अस्पृश्यता निवारण कार्यात डॉ. आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ- शरद पोंक्षे

-असली लोकं पक्षात नको म्हणत राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांवर अजित पवार बरसले!

-अजितदादांनी मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकलं; महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा

-मुंबईत 8 नगरसेवकांचे 60 झाले पाहिजेत… कामाला लागा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश