जितेंद्र आव्हाडांच्या जवळ गेल्यावर कळालं त्यांचा स्वभाव कसा आहे; मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतीसुमनं

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण 3894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर बघायचो. तेव्हा ते काय बोलतायेत?? कशासाठी बोलतायेत??,  हे कळत नसायचं. आता जवळ आल्यावर ते कसे आहेत हे कळतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

दरम्यान, ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-अस्पृश्य निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं कार्य श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोक्षेंची सावंतांनी उडवली खिल्ली!

-तुझी उंची किती, तू बोलतो किती…..; शिवसेना नेत्याने घेतला निलेश राणेंचा समाचार

-अस्पृश्यता निवारण कार्यात डॉ. आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ- शरद पोंक्षे

-असली लोकं पक्षात नको म्हणत राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांवर अजित पवार बरसले!

-अजितदादांनी मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकलं; महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा