“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदीेंच्या देहूतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असं वाटत होतं परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केलं. आता अजित पवारांना भाषण का करु दिलं नाही याची चर्चा रंगली. यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचा  रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेतेसदाभाऊ खोत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. त्यांना पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करा, असा सल्ला त्यांनी सुळेंना दिला आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एकत्र येऊन शपथविधी घेऊन मंत्रिमंडळ बनविले होते, तेव्हाचा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी थोडासा आठवून पाहावा. जेव्हा अजित पवार आणि फडणवीस एकत्र येतात, तेव्हा ते फडणवीस हे मुख्यमंत्री आणि पवार हे उपमुख्यमंत्रीच आहेत, असं वाटत असल्याचं खोत म्हणालेत.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण केल्यावर उपमुख्यमंत्री पवार यांना राज शिष्टाचारापोटी भाषण करता आलं नसावं, अशी बोचरी टीका खोत यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनिल परब यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस”

‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती