“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढंच गोपीचंद पडळकर करतात”

मुंबई | राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर हे आराजकता पसरवून सलोखा व समाजिक सलोखा बिघडवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ईशाऱ्यावर पडळकर यांचे काम सुरु, असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे.

पडळकर यांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली, बिरोबा त्यांचा खेळखंडोबा करेल, अशी टीका देखील सक्षणा सलगर यांनी केली आहे.

आज मी संपूर्ण महाराष्ट्रात टीव्ही चॅनलेच्या माध्यमांमधून भाजपनं गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती वायफळ बडबड करण्यासाठी आणि हायव्होल्टेज ड्रामा करण्यासाठी केली आहे. त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा टीव्हीवर पाहिला, असं त्या म्हणाल्यात.

शरद पवार यांच्या आणि मेंढपाळ बांधवांच्या उपस्थित तो कार्यक्रम होणार होता मात्र गोपीचंद पडळकर यांना ते पाहावत नव्हतं आणि अराजकता माजली पाहिजे. महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे, असा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे.

आज विष्णू माने या धनगर बांधवानं पुतळ्याचं बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केला. ते असताना त्यांचा 2 एप्रिलचा कार्यक्रम ठरला. देशातील राज्यातील नेते तिथं येणार आहेत, हे तुम्हाला बघवत नाही. हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचताय. तुमचा अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाननं चाललाय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सक्षणा सलगर यांनी केला आहे.

तुम्हाला भाजपचा अंजेडा चालवण्यसाठी आमदार केलंय का, असा सवाल सक्षणा सलगर यांनी केला. देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढा कार्यक्रम करणे, असं तुमचं सुरु असल्याचं सक्षणा सलगर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन’; एलोन मस्कचं वक्तव्य चर्चेत 

  पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा 

 “संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”