रानू मंडलला सलमान खानकडून मिळालं ‘हे’ गोड गिफ्ट!

मुंबई :  रेल्वे स्टेशनवर भारतातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हीडिओ पाहून अनेक दिग्गजांनी रानूच कौतुक केले. तर गायक हिमेश रेशमियाने रानूला आपल्या एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर आता अभिनेता सलमान खानने रानू मंडलला मुंबईत 55 लाख रुपयांच घर गिफ्ट केलं आहे.

रानूच्या आवाजाने सलमान प्रभावित झाला त्यामुळं त्यांना सलमानने 55 लाखाचं घर दिलं. एवढचं नाही तर दबंग 3 चित्रपटात तिला एक गाणं गाण्याची संधी दिली आहे, अशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रानू बरोबर हिमेशने केलेल्या रेकॉर्डींगचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हीडिओला 25 लाख व्ह्यूज आहेत आणि 48 हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिचा हा व्हीडिओ शेअर केला आहे. 

दरम्यान, हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिलं आहे, अशी माहिती कळतीय. मात्र हिमेशने देऊ केलेले हे मानधन रानू स्विकारत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले.

महत्वाच्या बातम्या-