मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी भूमीपुत्राची शक्कल; सुनिल केंद्रेकर म्हणतात…

बीड |  मराठवाड्यात ऊस लागवडीवर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस करणारा एक महत्वाचा अहवाल औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि मराठवाड्याचे भूमीपुत्र सुनिल केंद्रेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. या अहवालात मराठवाड्यात साखर कारखानदारीवरही बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सुनिल केंद्रेकर यांच्या अहवालाने मात्र साखर कारखानदारांचे चांगलेच धाबे दणादणे आहेत. त्यांच्या या अहवालाने संबंध मराठवाड्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सुनिल केंद्रेकर हे मूळचे मराठवाड्याचेच असल्याने दुष्काळ त्यांना नवा नाहीये. अनेक वर्षांपासून ते या दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या अहवालावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मराठवाड्यात ऊस लागवडीवर आणि कारखानदारी बंदी घालून मराठवाड्याचा दुष्काळी प्रश्न सुटेल काय? असेही प्रश्न या निमित्ताने लोकं आता विचारू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-