Top news नागपूर महाराष्ट्र

माणूस जेवढा शिकला तेवढा तो गाढव, डॉक्टर हे नालायक आहेत- संभाजी भिडे

Sambhaji Bhide

अमरावती | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जेवढा शिकलेला माणूस तेवढा गाढव आहे. डॉक्टर लोक हे नालायक आहेत, ते लुटारू आहेत. ते हरामखोर आहेत, डॉक्टर मारायच्या लायकीचे आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी भिडे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजी भिडे यांनी यावेळी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोनाच्या काळात लोक ही भीतीमुळे मेली. जी वाचली ती जगण्याची लायकीची नाही. माणूस जेवढा शिकला तेव्हा तो गाढव. डॉक्टर हे नालायक आहेत, ते रुग्णांना लुटतात.  ते हरामखोर आहेत, हे डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहे. त्यांच्याकडे कधी जाऊ नका, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

सभेत एक जण मास्क घालून बसला होता, त्या पाहून संभाजी भिडे यांनी मास्क काढण्यास त्याला सांगितले. तू मराठी माणूस आहे, काय XXडू नाही. या कोरोना हे थोतांड आहे. डॉक्टर हे नालायक आहे, असं म्हटलं.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त करून वाद ओढावून घेतला होता. कोरोनाच्या काळात ‘कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत, असं ते म्हणाले होते.

मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही, असंही वक्तव्य याआधी संभाजी भिडे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रियंका गांधींचा हटके प्रचार! बाॅडीगार्डसह नेते, कार्यकर्ते रस्त्यावर धावले; पाहा व्हिडीओ 

रशियाचं टेन्शन वाढलं! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली ‘त्या’ महत्त्वाच्या कागदावर सही

“राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा वयाचा विचार न करता धोतर फेडू”

संभाजीराजेंच्या हातून सुटलं संयोगिताराजेंचं उपोषण; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

“छत्रपतींचा अपमान करणारे छिंदम प्रवृत्तीचे लोक एकाच पक्षात कसे?”