संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलीवरून पडले; रूग्णालयात उपचार सुरू

सांगली | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आजच त्यांनी सांगलीच्या एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा निर्माण झाला होता.

अशातच आता संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलीवरून पडल्याची माहिती समोर आली आहे. यात त्यांनी गंभीर दुखापत झाल्याची माहिती देखील मिळाली आहे.

त्यांच्या कमरेखालील खुब्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना जवळच्या भारती रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. जवळच असलेल्या गणपती मंदिरात ते जात असताना ही घटना घडली.

पेठ परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जात असताना अचानक त्यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना आता रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सांगलीतील मिरज येथे बोलताना संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हिंदुस्तानला गांधी बाधा झालीये, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ममता बॅनर्जी 2024 च्या निवडणुकीत गेम चेंजर ठरतील”

 “माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले

 PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ