वाद पाणी, जात अन् बाथरूमचा! मुंबई पोलिसांकडून राज्य सरकारला अहवाल सादर

मुंबई |  राज्यासह देशात सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. राणा दाम्पत्याकडून राज्य सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.

लाॅकअपमध्ये असताना पाणी दिलं नाही, शौचालयास जावू दिलं नाही, असभ्य वर्तन करण्यात आलं, असा आरोप राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिलं होतं.

आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात फोटो आणि व्हिडीओ देखील जोडण्यात आले आहेत.

नवनीत राणा यांना लाॅकअपमध्ये असताना बिसलेरीचं पाणी देण्यात आलं. अधिकाऱ्यांसाठी असणारं बाथरूम त्यांना वापरण्याची परवानगी देण्यात आली, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

लाॅकअपमध्ये असताना राणा यांना अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वाॅशरूम वापरण्याची परवानगी देण्यात आली. तसेच चांगली वर्तवणूक देखील देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देणारे फोटो पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत.

नवनीत राणा यांनी पोलीस स्थानकातील पाणी नाकारल्यानंतर त्यांना बिस्लेरीचं पाणी देण्यात आलं. त्यानंतर त्यांना चहा देखील देण्यात आला. पांडे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष देखील निर्माण झाला होता.

दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. राणा यांनी अटक झाल्यानंतरही ठाकरे सरकारवर टीका चालूच ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले

 PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

 अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर