“सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत…” संभाजीराजे भूमिकेवर ठाम

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा बांधवांच्य न्याय हक्कांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा समाजाच्या हितासाठी सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आता आंदोलन मागं घेतलं जाणार नाही. अशी ठाम भूमिका सध्या संभाजीराजेंनी घेतल्यानं सरकारची पंचाईत झाली आहे.

ठाकरे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही. तब्बल विक्रमी मुक मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, अशी खंत मराठा बांधवांमध्ये आहे.

संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आमरण उपोषण पुकारल्यानं राज्यात प्रत्येक ठिकाणी आता मराठा समाजानं आंदोलन करायला सुरूवात केली आहे.

सरकारतर्फे चर्चा करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची आंदोलनस्थळी भेट घेतली. पाटील यांनी राजेंना आंदोलन मागं घेण्याची विनंती केली.

संभाजीराजे आपल्या आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली.

छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, सरकारकडून संभाजीराजेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यानं मराठा समाजासाठी योजना जाहीर करण्याची मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं”

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा