तुमच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा घुसलेय, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजें आक्रमक

मुंबई  | चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांचा अपमान झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. यावरूनच सध्या वादंग सुरू आहे. शाहू महाराजांचे वंशज आणि खासदार संभीजीराजे यांनी झी मराठी आणि अभिनेता निलेश साबळे याला सुनावलं आहे.

आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदान ही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. निलेश साबळे तसंच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

जर झी मराठी आणि निलेश साबळेने माफी मागितली नाही तर वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे, अशा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोनाचा झटका पुणे मुंबई ठाण्यासह नागपुरात शाळा, मॉल्स,जिम्स, थिएटर्स बंद!

-“एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला आज टोला मारतायत”

-कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द न होता या महिन्यात रंगणार IPL चे सामने

“इकडचा कोणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही… तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या”

-‘हवा येऊ द्या’मध्ये शाहू महारांजांचा आणि सयाजीराजेंचा अपमान?