‘या’ भाजप नेत्याकडून नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी, म्हणाले…

मुंबई | सर्वच राजकीय पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी देखील मैदानात उतरले असून ते वारंवार मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करताना दिसतात. अशात ओवैसींचा मोदींवर अन् योगींवर टीका करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. याला प्रत्युत्तर देताना भाजप नेता संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर देताना मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत केली आहे.

असदुद्दीन ओवैसींनी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांना उद्देशून धमकीवजा इशाराच दिल्याचं दिसत आहे. मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत, असं ओवैसी म्हणालेत.

आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. अल्लाह.. आपल्या ताकदीने तुम्हाला नेस्तनाबूद करेल आणि आम्ही हेच लक्षात ठेवू. जेव्हा वेळ बदलेल तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल? जेव्हा योगी आपल्या मठात जातील अन् मोदी डोंगरात निघून जातील, तेव्हा कोण येईल? आम्ही तेव्हा विसरणार नाही, असा इशारा ओवैसींनी दिला आहे.

ओवैसींनी दिलेल्या इशाऱ्याला भाजप नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. कोणाला धमकी देताय?, असा सवाल संबित पात्रा यांनी असदुद्दीन ओवैसींना केला आहे.

सुनों हम ना डरे थे मुगलों से ना जिन्नावादियों से तो तुमसे क्या खाक डरेंगे!. जेव्हा जेव्हा या वीर भूमीवर औरंगजेब आणि बाबर चालून येईल, तेव्हा मातृभूमीतून वीर शिवाजी आणि महाराणा प्रताप जन्म घेईन, असं प्रत्युत्तर संबित पात्रा यांनी दिलंय.

दरम्यान, औवेसी यांनी 12 डिसेंबर रोजी कानपूर येथील एका जनसभेला संबोधित करताना आक्रमक भाषण केलं होतं. त्यावेळी, त्यांनी पोलीसांना धमकीवजा इशाराच दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात अन् दिल्लीत येऊन ओमिक्रॉनबाबत चिंता व्यक्त करतात” 

‘तुला अशी निवृत्ती नको होती पण…’; हरभजन सिंगच्या निवृत्तीनंतर पत्नी भावूक

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर

‘पातळी सोडू नका’; आदित्य ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीकेनंतर नितेश राणेंना फडणवीसांनी सुनावलं