सेम टू सेम! करिश्मा कपूरसारख्या दिसणाऱ्या ‘या’ मुलीला पाहिलं का?, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई| असे म्हणतात की एकसारखे दिसणारे जगात सात चेहरे असतात. अनेकदा आपण याचा अनुभवही घेतोच. अगदी सेलिब्रिटीसारखे दिसणारे सर्वसामान्य माणसंही आपण यापूर्वी पाहिली आहेतच. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींप्रमाणे दिसणारे लोक समोर आले आहेत. आता अभिनेत्री करिश्मा कपूरसुद्धा या यादीमध्ये सामील झाली आहे.

काही दिवसापूर्वी माजी विेश्वसुंदरी ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या एका तरूणीचे फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अभिनेत्री करिश्मा कपूरसारखी दिसणाऱ्या एका तरुणीचे व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ पाहून नेटकरी खूपच आश्चर्चचकित होत ती तरूणी हुबेहूब करिश्मा कपूरसारखी दिसत असल्याचे सांगत आहेत. तुम्हालाही या तरूणीचे व्हिडिओ पाहून अजिबात विश्वास बसणार नाही की, ती करिश्मा कपूरची डुप्लिकेट आहे.

करिश्मा कपूर सारखी हुबेहुब दिसणारी मुलगी चक्क पाकिस्तानात! हुबेहुब करिष्मासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव हिना खान असून तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हिना टिक टॉकचा एक प्रसिद्ध चेहरा होती, पण जेव्हा या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली तेव्हा ती पूर्णपणे गायब झाली होती. पण आता लोकांची नजर पुन्हा एकदा हिनावर पडली आहे. हिना आता टिक टॉकच्या ऐवजी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव झाली आहे. टिक टॉकवर हिनाचे 2.9 दशलक्ष फॉलोअर्स होते, तर इंस्टावर तिचे अद्याप केवळ 36 हजार फॉलोअर्स आहेत. पण, आता पुन्हा एकदा हिनाची जादू चाहत्यांमध्ये वेगाने पसरत आहे.

करिश्मा कपूरचे गाणे आणि डायलॉग्सवर हिना नेहमी आपले व्हिडिओ तयार करत सोशल मीडियाद्वारे ते शेअर करत असते. सध्या तिचे हे व्हिडीओ फारच चर्चेत असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हिनाचे हे व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित होत तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तसेच यामध्ये ती हुबेहूब करिश्मासारखीच दिसत असून हावभावसुद्धा अगदी करिश्मा कपूरसारखेच देत असल्याचे सांगत आहेत.

हिनाचा चेहरा करिष्माशी इतका मिळता जुळता आहे की पहिल्यांदा पाहिल्यावर ती करिष्माच असल्याचे वाटते. हिनाचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तिच्या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत.

ती अगदी करिष्मा कपूरसारखी दिसत असल्याचे तिचे चाहत्यांचे म्हणणे आहे. हिना सांगते की तीदेखील करिष्मा कपूरची मोठी चाहती आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर करिष्माचे फोटोही शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

महत्वाच्या बातम्या – 

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर,…

‘बहु हमारी रजनीकांत’ फेम ‘या’…

ऐकावं ते नवलंच! एका झुरळामुळे इंजिनिअर पतीने पत्नीला मागितला…

थरकाप उडवणारं सत्य! ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या मृत्युनंतर सेटवर घडायच्या भयानक गोष्टी; वाचा सविस्तर

घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर