गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

मुंबई| सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुढीपाढव्याचं औचित्य साधत महाराष्ट्र सरकारतर्फे सण साजरा करण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनानं थैमान घातलं असल्यामुळे राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचे सावट असून सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे सलग दुसऱया वर्षी गुढीपाडवा साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. मिरवणुका, चित्ररथ, बाईक रॅली ही सणाची शान यंदा अनुभवता येणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून यंदा गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा असे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये गुढीपाडवा सणानिमित्त मिरवणूक आणि रॅली काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नसेल.

सोशल डिस्टन्सींगचे व स्वच्छतेचे सर्व ठिकाणी काटेकोर पालन करुन गुढी उभारुन हा सण साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यावर्षी गुढीपाडवा हा सण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजण्यापूर्वी साजरा करणे अपेक्षित.

तसेच रक्तदान शिबिर वगैरे यांसारखे कार्यक्रम स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने करण्यात येऊ शकतात, असंही नियमावलीत नमुद करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं सोडून इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. या नव्या लक्षणांमध्ये काही लक्षणं ही नवीन आहेत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणं, भूक न लागणे असे लक्षणं दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘बहु हमारी रजनीकांत’ फेम ‘या’…

ऐकावं ते नवलंच! एका झुरळामुळे इंजिनिअर पतीने पत्नीला मागितला…

थरकाप उडवणारं सत्य! ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या मृत्युनंतर सेटवर घडायच्या भयानक गोष्टी; वाचा सविस्तर

घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर

बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ