नवी दिल्ली | महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. मात्र ही आघाडी भाजप नेत्यांना पचलेली नाही. भाजप नेते संबित पात्रा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.
पात्रांनी बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्याची शिवसेनेला आठवण करुन दिली आहे. पात्रांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये बाळासाहेब शिवसेना आणि काँग्रेसविषयी बोलत आहेत. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. मला जेव्हा कळेल की शिवसेना काँग्रेस झाली आहे. तर मी माझं दुकान बंद करेन, असं बाळासाहेब व्हीडिओमध्ये म्हणत आहेत.
शिवसेना काँग्रेसमय झाली आहे असं मला वाटलं तर पुन्हा शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असं म्हणत बाळासाहेबांनी पक्ष सोडून गेलेल्या नारायण राणेंवर निशाणा साधला होता. आज राणेंना जो सन्मान मिळाला तो शिवसेनेमुळे मिळाला, असं ते व्हीडिओमध्ये म्हणत आहेत.
दरम्यान, संबित पात्रा ये टीव्हीवरील डिबेटमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्यांनी बाळासाहेबांचा 2004 सालचा व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.
“मैं मेरी शिव सेना को कभी कांग्रेस नहीं होने दूँगा …जिस दिन ऐसा होगा मैं शिव सेना बंद कर दूँगा …I will close shop ..”
श्री बालासाहेब ठाकरे
मगर अब लगता है राहुल गांधी ही शिव सेना की दुकान बंद करेंगे … pic.twitter.com/FeIbKRl6r2
— Sambit Patra (@sambitswaraj) December 1, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
छत्तीसगडप्रमाणे झारखंडमध्येही बदल घडवून आणला जाईल- राहुल गांधी-https://t.co/DxmLFIR8ZG @RahulGandhi @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“सरकार आता दाऊदवरील गुन्हेही मागे घेऊन क्लीन चीट देणार” – https://t.co/4KJ9P5VInw @mohitbharatiya_ @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
अयोध्या प्रकरणी जमियत उलेमा ए हिंदकडून फेरविचार याचिका दाखल- https://t.co/uiNZOjg69k @BJP4India @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019