“साहेब हृदयावर हात ठेवून सांगा…”; संदीप देशपांडे भावूक

मुंबई | हनुमान चालीसावरून राज्यात बराच गोंधळ चालला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भोंगे काढण्याचा आदेश मनसेसैनिकांना आदेश दिल्यानंतर वाद आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळालं.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहेत.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर बराच गोंधळ उडाल्याचं समोर आलं होतं. यावेळी संदीप देशपांडे पोलिसांना चकवा देत निघून गेले होते.

संदीप देशपांडे पोलिसांना चकवा देत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्यानं त्या जखमी झाल्या. त्यानंतर राज्यभरातून देशपांडेंना टीकेचा सामना करावा लागत आहे.

पसार असलेले संदीप देशपांडे यांनी आता या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आमच्या धक्क्यामुळं त्या पोलीस कर्मचारी पडल्या नाहीत, पोलीस आमच्यावर खोटे आरोप लावत आहेत, असं देशपांडे म्हणाले आहेत.

पोलिसांचा प्रोटोकाॅल पाहीला तर पुरूष पोलीस असताना महिला पोलीस पुरूषांना पकडायला पुढे जात नाहीत. माझ्या आजुबाजूला तिथं सात-आठ पोलीस उभे होते, असं देशपांडे म्हणाले आहेत.

माझ्या बाजुला पुरूष पोलीस असताना महिला पोलिसांचा तिथं असण्याचा प्रश्नच येत नाही. त्या महिला अधिकाऱ्यांना आमचा स्पर्शही झाला नाही. मग आम्ही गाडी घातली, धक्का दिला असा आरोप का होत आहे, असंही देशपांडे म्हणाले आहेत.

माझा प्रश्न आहे कासकर साहेबांना. कासकर साहेब ह्रद्यावर हात ठेवून सांगा माझ्या धक्क्यानं त्या अधिकारी पडल्या का?, असंही देशपांडे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’

हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”