“भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत”

मुंबई | बुलडाण्यामधील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.  भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देत संजय गायकवाड यांनी बोंडेंवर टीका केलीये.

शरद पवार साहेबांच्या कामाची उंची हे कधीच समजू शकत नाहीत. शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम केलं आहे, असं ते म्हणालेत.

शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची जोड दिली. केंद्रीय कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. हे धाडस फक्त शरद पवार हेच करू शकतात, असं सांगत गायकवाड यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र ते कधीही कोणाला वाईट बोलले नाहीत. त्यांच्या घरावर अशापद्धतीने हल्ला होणं हे दुर्दैवी असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गेल्या अडची वर्षांपासून याना त्या कारणाने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात हिंसा निर्माण करून, त्यांचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आहे, असं ते म्हणालेत.

भाजप राज्यातील सरकार अस्थिर करून पहात असल्याचा आरोप देखील संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महत्त्वाची माहिती समोर 

“हलकट राजकारण कधी अनुभवलं नाही, पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्यानंतर…” 

बॅटिंग करता करता आश्विनने सोडलं मैदान; IPL इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…

Sharad Pawar : “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज…”

विमानात स्मृती इराणींना महिलेने महागाईवरून विचारले प्रश्न; पाहा विमानात काय काय झालं…