शिवसेना खासदारांमध्ये फूट?, संजय राऊत आणि खासदारांमध्ये ‘या’ मुद्द्यावरून जुंपली

मुंबई | शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत फुटल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. सेनेच्या 40 आमदारांनी भाजपच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार पाडलं व राज्यात शिंदे सरकार स्थापन केलं.

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदारांमध्येदेखील फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडले आहेत.

सेनेच्या बहुतांश खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

संजय राऊतांच्या या मागणीला इतर खासदारांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून संजय राऊत व इतर खासदारांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली.

अखेर याबाबतच्या निर्णयाचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. त्यात खासदारांचं बहुमत लक्षात घेता उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतील असं म्हटलं जात आहे.

40 आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. यात 22 खासदारांपैकी 7 खासदार अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला धक्का बसला असताना खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!

हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला