‘तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही तर…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत, असं राऊत म्हणालेत.

खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होतात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं. हा एक रेकॉर्ड आहे. आम्ही तुम्हाला किती कळवलं त्याचा. मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांवर काम करतीलच, पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आमच्या सगळ्यांचे फोटो टॅप केलेत. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत. फक्त केंद्रातच नाहीत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहे, असा आरोपही त्यांनी पुन्हा केला आहे.

भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत, याची माहिती संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून मी गोळा केली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईन. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका” 

प्रियंका गांधींचा हटके प्रचार! बाॅडीगार्डसह नेते, कार्यकर्ते रस्त्यावर धावले; पाहा व्हिडीओ