सतास्थापनेचे शिलेदार खासदार संजय राऊत सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच गेले मंत्रालयात

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत पहिल्यांदाच मंत्रालयात गेले.

संजय राऊत मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी कशावर चर्चा होणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संजय राऊत यांनी नेहमीत आपल्याला मंत्रालय, विधानभवनात जाण्यास रस नाही म्हटलं आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांचा मंत्रालय भेटीचा योग महत्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, यापूर्वी 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातही संजय राऊत केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले होते. त्यांना पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यासोबत मंत्रालयात नेलं होतं. आता महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर संजय राऊत यांची पहिलीच मंत्रालय भेट आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील”

-बीगबींनी केलं रोहित शर्माच तोंडभरून कौतुक

-…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री

-महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”

-शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही- सुधीर मुनगंटीवार