“एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील”

मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील अशी भिती केंद्र सरकारमधील काहींना वाटत होती. म्हणूनच केंद्र सरकारने राष्ट्रीय यंत्रणेकडे हा तपास सोपवला असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

राज्याला विश्वासात न घेता केंद्राने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांकडून याबाबतचा कायदेशीर अभिप्राय आम्ही मागितला आहे. त्यानंतरच याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.

मला अनेक संघटना भेटल्या. भीमा-कोरेगाव प्रकरणी अनेकांची नावे केवळ पूर्वग्रहदूषितेतून गोवल्याची व्यथा त्यांनी आपल्याकडे मांडल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदू असुदेत किंवा मुसलमान, आदिवासी किंवा कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती असो. राज्यातील प्रत्येकाला मी हे आश्वासित करू इच्छितो की सीएए आणि एनआरसीमुळे एकाही व्यक्तीचं नागरिकत्व आम्ही जाऊ देणार नाही, असं आश्वासन देशमुख यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या- 

-बीगबींनी केलं रोहित शर्माच तोंडभरून कौतुक

-…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री

-महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”

-शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही- सुधीर मुनगंटीवार

-सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय