संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटलांनी मला चहा पाजायला हवा, मी त्यांना…”

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून भाजपने महाविकास आघाडीवर आणि खासकरून शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात गैरहजर असल्याने भाजपने वारंवार मुख्यमंत्र्यांना टोले लगावले आहेत. (Sanjay Raut has now responded to Chandrakant Patil’s criticism)

अशातच आता शिवसेनेच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्याला हल्लावरून भाजपवर पलटवार सुरू केला आहे. अशातच आता शिवसेनेचे सेनापती समजले जाणारे संजय राऊत माध्यमांसमोर आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद हे आयतं मिळालं असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

तळागाळातून वर येणाऱ्या व्यक्तीला सामान्य माणसाची जाण असते तसेच त्यांना परिस्थितीची देखील जाण असते. बाळासाहेब ठाकरे यांनी मेहनत घेतली. मात्र, उद्धव ठाकरे यांना आयतं ताट मिळालं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या टीकेवर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला काय मेहनतीने थाळी मिळाली आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

या देशाच्या राजकारणामध्य कष्ट करावं लागतं. बाळासाहेब ठाकरेंनी फक्त उद्धव ठाकरेंनाच नाही तर आमच्यासारख्या अनेकांना खूपकाही दिलं आहे, असं राऊत म्हणाले.

आजचा भाजप महाराष्ट्रात ज्या थाळीमध्ये खात आहे ती थाळी सुद्धा बाळासाहेबांनीच भरलेली आहे, असं चोख प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं आहे. कोविडच्या काळात रिकाम्या थाळ्या वाजवल्यात. तुमचा संबंध त्याच थाळी पुरता आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविषयी लिहिल्यानंतर त्यांची छाती भरून आली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याबद्दल त्यांनी मला चहा पाजायला पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

Omicronची लक्षणं किती काळ राहतात?, स्वतःची टेस्ट कधी करावी?; वाचा सविस्तर

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी अन् कंगना पंजाबवर भडकली, म्हणाली…

मुलगा हट्टाला पेटला अन् बापाचं नशीब बदललं, रातोरात मालामाल

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस यांचं नवं ट्विट चर्चेत

राज ठाकरेंना मोठा धक्का! न्यायालयाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी