Omicronची लक्षणं किती काळ राहतात?, स्वतःची टेस्ट कधी करावी?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना (Corona) आकडेवारी खूपच वेगाने वाढत असल्याचं दिसत आहे. देशातील नवीन कोरोना रूग्णांची आकडेवारी आता 90 हजारावर पोहचली आहे.

अशातच आता ओमिक्राॅनने (Omicron) देखील सर्वांचंच टेन्शन वाढवलं आहे. अशातच आता ओमिक्राॅनची लक्षणं किती काळ राहतात? आणि स्वतःची टेस्ट (Test) कधी करावी?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यावर आता तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

इतर कोरोना स्ट्रेनप्रमाणे, ओमिक्रॉनची लक्षणे काही दिवसातच स्पष्ट होतात, असं डाॅ. कोएत्झी यांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये आढळणारी लक्षणे डेल्टा प्रकारातील लक्षणांपेक्षा खूपच सौम्य असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना या स्थितीत अनेकदा स्नायू दुखणं, डोकेदुखी आणि थोडा थकवा जाणवतो. त्यापेक्षा जास्त काही होत नाही. साधारण पाच दिवसांनी लक्षणे निघून जातात.

WHOच्या म्हणण्यानुसार कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे दिसायला सरासरी 5 ते 6 दिवस लागतात. काही प्रकरणांमध्ये यासाठी 14 दिवसही लागू शकतात.

ओमिक्राॅनच्या बाबतीत, ते संक्रमणानंतर 3 ते 14 दिवसांच्या दरम्यान कधीही दिसू शकतात. एक आजारी व्यक्ती लक्षणं सुरू होण्याच्या सुमारे दोन दिवस आधी आणि 10 दिवसांपर्यंत इतरांना संक्रमित करू शकतो.

एका आठवड्यात कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. मात्र एकदा कोरोना पाॅझिटीव्ह आल्यानंतर इतर लोकांना दीर्घकाळ संसर्ग होत नसण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी अन् कंगना पंजाबवर भडकली, म्हणाली…

मुलगा हट्टाला पेटला अन् बापाचं नशीब बदललं, रातोरात मालामाल

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस यांचं नवं ट्विट चर्चेत

राज ठाकरेंना मोठा धक्का! न्यायालयाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण