मुंबई | मागील तीन दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संजय राऊतांवरील कारवाईसंबंधी पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच संजय राऊत मुंबईत आले. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर देखील टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
त्यावर आता संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का?, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
मी शिवसेनेमध्ये असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
तुम्ही राजकारणातील मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. केंद्रीय यंत्रणेचा शिखंडीसारखा वापर करुन मागे वार करु नका, असा सल्ला देखील राऊतांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”
ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…
नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं
“गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक
मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं