“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पा तुम्ही एकत्र बसा आणि हा प्रश्न कायमचा सोडवून टाका”

बेळगाव | बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात तरिही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ते बेळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मी गेल्यावर उद्धव ठाकरेंना बेळगावची परिस्थिती आणि लोकांच्या भावना सांगेल. बेळगावचा विषय 14 वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. आता एकदा प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्याच्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जसं राम मंदिराचा विषय असंख्य वर्षांनंतर न्यायालयातून सूटला. तसंच बेळगाव प्रश्नही न्यायालयाच्या माध्यमातून सुटावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-पप्पा तुम्ही लवकर परत या…; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदयद्रावक निबंध व्हायरल

-“कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न संपवला… मग सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे??”

-…पण आपण केवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून भांडत आहोत याची खंत वाटते- बाबासाहेब पुरंदरे

-काँग्रेस धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे- अमित शहा

-महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा