पप्पा तुम्ही लवकर परत या…; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदयद्रावक निबंध व्हायरल

बीड | कमी वयातच काळाने लाड पुरवणारा बाप हिरावून घेतला. अशातच शाळेत निबंधाचा विषय आला  माझे वडील. त्यानंतर 10 वर्षाच्या निरागस पोरानं जो निबंध तो वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर हा निबंध सोशल माध्यामांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

मंगेश परमेश्वर वाळके असं या मुलाचं नाव आहे. बीड जिल्हयातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथीमध्ये शिकत आहे. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचं निधन झालं. मंगेशचं कुटूंब अजुनही पुर्णपणे या  धक्क्यातून सावरलं नाही. अशातच शाळेत वडिलांवर निबंध लिहायला लावल्यावर मंगेशनं वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टिबी आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने मला मामाच्या गावी पाठवले होते. माझो पप्पा वारले. पप्पा घरात नसल्यावर कोणीच  मदत करत नाही. रात्रीची आम्हाला चोरांची भिती वाटते. पप्पा तुम्ही लवकर या.., अशा शब्दात मंगेशनं त्याच्या संवेदना पानावर उमटवल्या आहेत.

दरम्यान, मंगेशची आई अपंग आहे. त्यामुळे वडिलांच्या जाण्याचा त्याला धक्काच बसला आहे. त्याने आपल्या निबंधातून वडिलांची कमतरता मांडली आहे.

                                                    मंगेशचा निबंध-

mangesh essay

महत्वाच्या बातम्या-

-“कलम 370 हटवून काश्मीरप्रश्न संपवला… मग सीमाप्रश्न सोडवायला काय अडचण आहे??”

-…पण आपण केवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून भांडत आहोत याची खंत वाटते- बाबासाहेब पुरंदरे

-काँग्रेस धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे- अमित शहा

-महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

-…अन् केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालंय- प्रकाश आंबेडकर