“…यांना पहाटे पापकृत्य करायची सवय आहे”; संजय राऊत संतापले

मुंबई | घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तसेच ..यांना पहाटे पापकृत्य करायची सवय आहे, अशी टीकाही राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.

एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार हे उत्तम रित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवत असतो, असंही ते म्हणाले.

शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही, असंही ते म्हणाले. आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी शब्द दिला ते शब्द पाळतील पण त्यांनी ते पाळले नाहीत, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ 

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election Result | अखेर निकाल लागला; संजय राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी