“जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”

मुंबई | जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिलाय.

जशास तसं उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसं उत्तर आम्ही नेहमीच देत असतो, हे आमचं बाळकडू आहे. काल शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी सर्वांची बैठक घेतली. खासदारांची वेगळी बैठक घेतली, प्रवक्तांची वेगळी बैठक घेतली आणि त्यांनी काही नक्कीच सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरं जाण्यासाठी तयार आहे. कोणीही समोर येऊ द्या. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत.आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत.

महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे, सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे, असंही ते म्हणालेत.

आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं , असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

राणा दाम्पत्याला मोठा झटका, महत्त्वाची माहिती समोर

‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला