“देशासाठी हौतात्म्य आलं तरी चालेल पण मी…”

मुंबई | मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Navab Malik) यांची आज सकाळपासूनच ईडीने चौकशी सुरु केली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा या केवळ महाविकास आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांसाठीच बनलेल्या आहेत का?, असा सवाल यांनी केला. या सगळ्याचा मी जाब विचारणार असून देशासाठी हौतात्म्य आलं तरी चालेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

23 हजार कोटींचा शिपयार्ड कंपनीचा बँक घोटाळा आहे. इतके वर्ष त्याला कोण संरक्षण देत होतं, आताही ऋषी अग्रवाल यांना वाचवण्यासाठी पहाडाप्रमाणे कोण उभं आहे? कुठली तरी एक शक्ती आहे सरकारमधली. ती कोण आहेत? कोणत्या तपास यंत्रणा आहेत, काय आहे? हे सगळं समोर येणार आणि याच्या परिणामांची पर्वा मी करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

देशाच्या हिताची गोष्ट आहे, ती आम्ही करतो. शेवटी राष्ट्राच्या हितासाठी हौतात्म्य पत्करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, असंही राऊत म्हणालेत.

स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे भ्रष्ट आणि वाळवीनं पोखरलेल्या आहेत. कशाप्रकारे त्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली, विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळं एकदा समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झालं.

जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले आहेत. तब्बल गेल्या 3 तासांपासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

ईडीकडून मंत्री नवाब मलिकांची पहाटेपासून चौकशी सुरू, काय आहेत आरोप? 

राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार झटका; रात्री बारा वाजता केला करेक्ट कार्यक्रम 

“येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच” 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी!